नवी मुंबई पालिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे

महापालिकांनी अतिक्रमण रोखणे अपेक्षित असताना स्वत: नवी मुंबई महापालिकाच अतिक्रमण करत असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने ओढलेत. 

Updated: Nov 16, 2016, 05:43 PM IST
नवी मुंबई पालिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : महापालिकांनी अतिक्रमण रोखणे अपेक्षित असताना स्वत: नवी मुंबई महापालिकाच अतिक्रमण करत असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने ओढलेत. 

नवी मुंबईच्या महापौर बंगल्याशेजारी असलेलं उद्यान महापौरांच्या सुरक्षेच्या मुद्यावर सर्वसामान्यांना वापरण्यास पालिकेने मनाई केली आहे. त्यामुळे हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आलीय. त्यावरील सुनावणीवेळी हायकोर्टाने हे मत व्यक्त केले आहे.

सिडकोच्या जागेवर असणाऱ्या या उद्यानामुळे महापौरांच्या सुरक्षेला नेमका काय धोका आहे, याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून घ्या आणि कोर्टाला त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा, असे आदेशही उच्च न्यायालयाने दिलेत. 

या ठळकबाबी

- या ठिकाणी आधीपासूनच अनेक उद्यानं असल्यानं तिथं आणखी उद्यानाची गरज नाही, सिडकोची भूमिका 
- ही जागा विकत घ्यायची नसल्यास ती परत करण्यात यावी, उच्च न्यायालयाचे मनपाला आदेश
- उद्यानाची जागा ही सिडकोची आहे ती जागा मनपाने विकत न घेता महापौरांच्या सुरक्षेचे कारण देत स्वत:हूनच उद्यान बंद केलं आहे, अशी तक्रार करण्यात आली आहे.
-उद्यानाची जागा अशी चुकीच्या पद्धतीनं नियंत्रणात ठेवण्यापेक्षा ती सिडकोकडून विकत का घेत नाही, अशी विचारणा हायकोर्टाने पालिकेला केली.
- सिडकोनं आपली भूमिका बदलल्याचा दावा नवी मुंबई महापालिकेनं केला आहे.