नागपूर : देशात पशु पालन व्यवसायाला महत्व असून या पशुपालनाला उभारी दिल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही. असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केलंय. जल, जमीन, जंगल आणि जनावरं हे एक दुस-याला पूरक असून याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचं डॉ. भागवत यांनी सांगितलंय.
नागपूरच्या पशु वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या सोहळ्यात ते बोलत होते. देशात आज पशुवैद्यकांची संख्या वाढण्याची गरज असून त्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं केंद्रीय कृषी राज्य मंत्री डॉ संजीव कुमार बल्यान यांनी यावेळी सांगितलं.