जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भाजप मधील दोन जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे तसंच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचं राजकीय वैर लपून राहीलं नाही ते सर्वश्रृत आहे. याचा प्रत्यय जळगाव जिल्ह्या बँकेत खडसेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिसला.
जळगाव जिल्हा बँकेत शेतकरी पुनर्गठन साठी आपण ५०० कोटींची मागणी केली होती, त्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन तसंच खडसेंचे कट्टर विरोधक असलेले सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडेही पैसे मिळवण्यासाठी गळ घातली अजून मिळाली नाही अशी खोचक टीका खडसेंनी केली.
यावेळी बोलताना खडसेंनी गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून दोनदा उल्लेख केला. मात्र नंतर खडसेंनी मी माजी पालकमंत्री म्हणून माझा उल्लेख केला असा खुलासा केला.