मुंबई : राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या जाहिराती पेट्रोल पंप, रेल्वे आणि बसवर लागलेल्या आहेत. या जाहिरातींवर काँग्रेसनं आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आहे.
या भेटीमध्ये सचिन सावंत यांनी या जाहिराती काढण्याची मागणी केली आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच ही कारवाई करण्यात यावी असं सचिन सावंत म्हणाले आहेत.