मुख्यमंत्री महोदय, श्रुती वाचली असती हो....

 औरंगाबादमधल्या श्रुती कुलकर्णीच्या मृत्यूला 36 तास उलटले असले तरी आरोपी स्वप्निल मणियारला अजूनही अटक झाली नाहीये..

Updated: Aug 21, 2015, 07:34 PM IST
मुख्यमंत्री महोदय, श्रुती वाचली असती हो.... title=

औरंगाबाद : औरंगाबादमधल्या श्रुती कुलकर्णीच्या मृत्यूला 36 तास उलटले असले तरी आरोपी स्वप्निल मणियारला अजूनही अटक झाली नाहीये..

त्याच्या तपासासाठी पोलिसांची २ पथके रवाना झाल्याची माहिती मिळतेय... त्यानं त्रास दिल्यामुळंच श्रुतीचा मृत्यू झालाय, श्रूतीच्या मृत्यूपूर्व चिठ्टीतही याचा उल्लेख आहे असं असूनही अटक का करण्यात आली नाही हा प्रश्न कायम आहे..

आरोपीचा शोध सुरु असल्याचंच पोलिस सांगत आहे.. त्यामुळं इतकी मोठी घटना घडूनही पोलिसांना अजून जाग आली नाही का हाच खरा प्रश्न आहे...

पीएसआय हरीश खटावकरांची चौकशी होणार

औरंगाबादेत छेडछाडीला कंटाळून तरुणीनं आत्महत्या केल्या प्रकरणी सिडकोचे पोलीस उपनिरीक्षक हरीश खटावकरांची चौकशी करण्यात येणार आहे. औरंगाबादचे पोलिस आयुक्त अमितेष कुमार यांनी याबाबत माहिती दिलीय. श्रुती कुलकर्णीच्या आत्महत्येला पोलीसच जबाबदार असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला होता.

सततच्या छेडछाडीला कंटाळून औरंगाबादेत एका तरुणीनं आपली जीवनयात्रा संपवलीय...याप्रकरणी पोलिसांची भूमिकाही वादग्रस्त ठरतेय. 

काय होतं पत्रात...

आई, मला माफ कर... माझ्या चुकीमुळे तुला आणि सगळ्यांनाच खूप त्रास झाला...सॉरी...मला असं करायचं नव्हतं गं....पण खरं सांगते आई, त्या स्वप्नीलनं माझ्यासमोर काही ऑप्शनच ठेवला नाही....मला तुझं नाव खूप मोठं करायचं होतं गं....

वरील पत्र लिहिणारी श्रुती कुलकर्णी आता या जगात नाही...सततच्या छेडछाडीला कंटाळून 21 वर्षांच्या श्रुतीनं आत्महत्या केलीय. स्वप्नील मणियार नावाचा तरुण कॉलेजमध्ये श्रुतीसोबत होता...याच स्वप्नीलनं तिची स्वप्नंच नव्हे, तर तिचं आयुष्यच उद्धवस्त केलं... श्रुतीनं कॉलेज बदललं तरी स्वप्नीलचा त्रास काही संपला नाही...काही दिवसांपूर्वीच स्वप्नीलच्या विरोधात धमकीची तक्रार सिडको पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला 3 ऑगस्टला अटक केली... पण लगेच त्याची जामिनावर सुटका झाली... जामिनावर सुटताच त्यानं पुन्हा श्रुतीला त्रास द्यायला सुरुवात केली. या जाचाला कंटाळूनच श्रुतीनं टोकाचं पाऊल उचललं...
 

पोलिसांनी सहकार्य केलं नसल्यामुळेच आपली बहीण जीवाला मुकल्याचा आरोप श्रद्धा कुलकर्णी या श्रुतीच्या बहिणीनं केलाय. या सगळ्या प्रकारात पोलिसांची भूमिका वादग्रस्त ठरलीय. पोलीस मात्र सुसाईड नोटचा हवाला देत हात वर करतायत...

महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत...असे ढोल सरकार बडवतं....पण राज्यात खरंच मुली आणि महिला सुरक्षित आहेत का? श्रुतीच्या आत्महत्येनं पोलिसांच्या कार्यक्षमेतवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय...