हैदराबादहून येऊन कुणी ऐरा-गैरा राज्य करू शकत नाही- मुख्यमंत्री

औरंगाबादमध्ये भाजपनं प्रचाराचा धडाका लावलाय. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रचारात सहभाग घेतली. मुख्यमंत्र्यांचीही आज प्रचार सभा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी एमआयएम पक्षावर टीका केली. तसंच सत्ता काबीज करण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन केलं. 

Updated: Apr 18, 2015, 09:03 PM IST
हैदराबादहून येऊन कुणी ऐरा-गैरा राज्य करू शकत नाही- मुख्यमंत्री title=

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये भाजपनं प्रचाराचा धडाका लावलाय. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रचारात सहभाग घेतली. मुख्यमंत्र्यांचीही आज प्रचार सभा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी एमआयएम पक्षावर टीका केली. तसंच सत्ता काबीज करण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन केलं. 

तर राष्ट्रवादीवर टीका करताना राष्ट्रवादीच्या नेत्यांची चौकशी करुन त्यांना त्यांच्या जागेवर पाठवू असा हल्लाबोल केला. इंदू मिलसाठी आम्ही जागा दिली, आधीचे लोक कायदा बनवावा लागेल असं खोटं सांगत होते. असा आघाडी सरकारवर आरोप केला. मुख्यमंत्र्यांनी भाषणात औरंगाबादचा उल्लेख आवर्जून संभाजीनगर असा केला. 

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे -

- हैदराबादहून येवून कुणी ऐरा गैरा राज्य करू शकत नहीं, त्यानी परत जावे
- अशोकराव म्हणतात राज्यात लवकरच मध्यावधी होइल अशोकराव वांद्रे इथे काय झाले विसरले का?
- एनसीपीचं काय सांगावे कमावलेले खूप आहे त्यांनी मात्र काळजी करू नका चौकशी सुरु आहे, यांना योग्य जागी पोहोचवणार
- आधीचं सरकार थापाडं होतं. लोकांसोबत तर खोटे बोलतातच अणि आपल्या बापा सोबतही खोटं बोलतात
- इंदू मिलची जागा आम्ही दिली अणि आधीचे लोक कायदा बनवावा लागेल, असे खोटे सांगत होते
- मोदीजींनी ठरवले आणि करुण दाखवले
- बाबासाहेबांचे लंडनचे घर विकायला निघाले होते सरकारने निर्णय घेतला मोदीजींनी मदत केली आणि आम्ही ते घर विकत घेतले
- औरंगाबादला आम्ही पर्यटन हब बनवणार
- औरंगाबादला २५ कोटी दिले हा ट्रेलर होता. आता औरंगाबादचे रस्ते सुधारण्याचे हे माझे काम आहे मी करणार
- औरंगाबादला आपली सत्ता आणा केंद्र अणि राज्याची ताकद मिळेल अणि औरंगाबाद स्मार्ट सिटी होईल हा माझा विश्वास आहे
- माझी विनंती आहे पुन्हा एकदा युतीला सत्ता दया, राज्याच्या तिजोरीची किल्ली तुम्हाला देणार

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.