पुणे : राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर महाराष्ट्रासह पुणे बीडमध्येही काही भागांत जोरदार पावसासह गाराही पडल्या.
येवलालमध्येही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मालेगाव तालुक्यात कवलाने साकोरे नीमगाँव भागात गारांच्या वादळी पावसामुळे झाडं आणि शेती जमीनदोस्त झाली आहे.
पुण्यातही रिमझिम पाऊस असुन दिवेघाट, सासवड , पुरंदर भागात गारांसह पाऊस पडला. येवला शहर आणि तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपलंय. जोरदार वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसानं शेतक-यांची दाणादाण उडवली.
नुकताच काढलेल्या कांदा पीकाचंही या पावसामुळं अतोनात नुकसान झालंय. कांदा व्यापा-यांच्या कांदा चाळी देखील तुटून पडल्यात. याशिवाय द्राक्ष, डाळिंब, हरभरा या पीकालाही या अवकाळी पावसाचा फटका बसलाय. वादळी वारा आणि पावसामुळं ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्यात.
तसंच काही ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडीत झालाय. बीडलाही अवकाळी पावसानं झोडपडलंय. या पावसामुळं शेतक-यांचं अतोनात नुकसान झालंय.. या पावसाने सखल भागात पाणी साचलं होतं.तर काही भागात छोट्या छोट्या गारा देखील पडल्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.