औरंगाबाद : मराठवाड्याच्या शिरपेचात मराठमोळ्या कन्येनं मानाचा तुरा रोवलाय. औरंगाबादची नवेली देशमुख 'मिस दिवा युनिव्हर्स' स्पर्धेत सेकंड रनर अप ठरली. त्यामुळे ती आता 'मिस इंडिया' स्पर्धेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झालाय.
तब्बल महिन्याभरानंतर नवेलीचं औरंगाबादमध्ये आगमन झालं. ढोल ताशाच्या गजरात औरंगाबादकरांनी नवेलीचं स्वागत केलं. ही स्पर्धा जिंकल्यानंतर ती आता 'मिस इंडिया' स्पर्धेत सहभागी होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.