दिवाळीत पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांनी केली ९ हजार नवीन वाहनांची खरेदी

Updated: Nov 6, 2016, 05:41 PM IST
दिवाळीत पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांनी केली ९ हजार नवीन वाहनांची खरेदी title=

पुणे आणि पिंपरी चिंचवडकरानी या दिवाळीत नऊ हजार नवीन वाहनांची खरेदी केली आहे. त्यामुळं आता दोन्ही शहरातील दुचाकी आणि चार चाकीची संख्या तीस लाखाच्या घरात जाऊन पोहचली आहे.

दिवाळीच्या या वाहन खरेदीतून पुणे आणि पिंपरी चिंचवडकरानी शासनाच्या तिजोरीत २१ कोटींची भर घातलीय. वाहन विक्रीत यावर्षी दहा टक्यांची वाढ झाली आहे. दिवाळीच्या या खरेदीनंतर दोन्ही शहरातील दुचाकीची संख्या २३ लाख तर चार चाकी ६ लाख असे एकूण ३० लाखाच्या घरात हा आकडा पोहचला आहे.