मुंबई : होय मी मुख्यमंत्री होणार, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी म्हटलं असल्याचं सामनाचे संपादक संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मुलाखतीत उद्धव ठाकरे म्हणाले आहेत, महाराष्ट्राची जनता मुख्यमंत्री ठरवते, महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलं तर मी मुख्यमंत्री होईल, मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री यावेळी महाराष्ट्रातून ठरेल, दिल्लीतून नाही, असं उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत म्हटलं असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
युती तुटल्याची खंत आहे, असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
जनतेने ठरवलं, तर चहावाला पंतप्रधान होऊ शकतो, तर जनतेने ठरवलं तर ठाकरे घराण्यातलाही मुख्यमंत्री होऊ शकतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
ठाकरे घराण्यात कुणीही जबाबदारी सोडून पळालेलं नसल्याचंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.