मुंबई- बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा 'एअरलिफ्ट' चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाचं प्रेक्षक आणि समिक्षकांकडूनही कौतूक होत आहे. एअरलिफ्टचं जेवढं कौतूक होतंय, त्यामुळे अक्षय कुमारच्या फॅन्सची संख्या नक्कीच वाढेल.
काय आहे कथा ?
या चित्रपटात अक्षय कुमार आणि निमरत कौर प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट खऱ्या कहाणीवर आधारित आहे. ही कथा आहे कुवेतमध्ये राहणा-या भारतीय उद्योगपती रंजीत कटियाल म्हणजेच अक्षय कुमारची. कुवेतमध्ये सगळं व्यवस्थित सुरु असतं, पण इराण आणि कुवेतमध्ये युद्धाला सुरुवात होते, आणि मग वातावरण बदलतं, त्यानंतर कुवेतमध्ये असलेल्या 1 लाख 70 हजार भारतीयांना भारतात परत आणण्याची मोहीम सुरु होते. त्यावरच आधारित आहे 'एअरलिफ्ट'
अक्षय कुमारचा हा 'एअरलिफ्ट' बघताना तुम्हाला आपण भारतीय असल्याची जाणीव करुन देते. त्यामुळे या 5 कारणांसाठी एअरलिफ्ट बघाच
5 दमदार अभिनय
मोठी नाव आणि लार्जर दॅन लाईफ बॉलीवूड सिनेमांमध्ये 'एअरलिफ्ट' तुम्हाला अभिनेत्यांची भेट करून देतो. अक्षय कुमार असो किंवा त्याच्या पत्नीची भूमिका केलेली निमरत कौर.. सगळ्यांनीच आपल्या अभिनयाला न्याय दिला आहे. या चित्रपटातल्या कोणत्याच अभिनेत्याच्या अभिनयावर बोट दाखवयलाही जागा नाही.
4 दमदार संवाद
'इंसान की ना, फिदरत ही ऐसी होती.. चोट लगती है न, तो आदमी मां मां ही चिल्लाता है सबसे पहले'.... यासारखे अनेक संवाद या चित्रपटाचा प्लस पॉईंट आहे. अक्षय कुमारचे इराकी जनरल सोबतचे डायलॉग तुम्हाला भारतीय असल्याची जाणीव करुन देते.
3 बॅकग्राऊंड म्युजिक
एअरलिफ्टचं बॅकग्राऊंड म्युजिक तुम्हाला, खिळून ठेवतं. अनेक शॉट्समध्ये कोणत्याही डायलॉगशिवाय फक्त म्युजिकच्या मदतीनं सीन प्रेक्षकांच्या समोर उभा राहतो.
2 जबरदस्त पटकथा
खऱ्या घटनेवर आधारित असलेला हा चित्रपट बघताना प्रेक्षक एक सेकंदही बोर होणार नाही, इतकच काय पण चित्रपट बघताना तुम्हाला दुसरा काही विचार करायलाही लावत नाही.
1 अक्षय कुमार
जर तुम्ही अक्षय कुमारचेचे फॅन्स असाल तर 'एअरलिफ्ट' नक्की बघा. आणि जरी तुम्ही अक्षयचे फॅन नसाल तरीही असा चित्रपट मिस करू नका. 'एअरलिफ्ट'नंतर अक्षयनं पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केल आहे, की तो फक्त सुपरस्टारच नाही तर अभिनेता आहे.