सलमानची लव्हस्टोरी सुरु, प्रेयसीची दिली ओळख

अभिनेता सलमान खान आणि रोमानियाची मॉडेल लुलिया वेंतुर यांच्या प्रेमसंबंधाबद्दल काही दिवस चर्चा सुरु होती. मात्र, याला पूर्णविराम मिळाल्यात जमा आहे. कारण खुद्द सल्लूने आपल्या प्रेयसीची ओळख करुन दिलेय. अर्पिताच्या लग्नाच्यावेळी या दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालविल्याचे कळते. इतकेच नाही तर सलमानने आपल्या कुटुंबियांसमोर लुलियाची ओळख त्याची प्रेयसी अशी करून दिली.

Updated: Nov 22, 2014, 10:39 AM IST
सलमानची लव्हस्टोरी सुरु, प्रेयसीची दिली ओळख title=

मुंबई : अभिनेता सलमान खान आणि रोमानियाची मॉडेल लुलिया वेंतुर यांच्या प्रेमसंबंधाबद्दल काही दिवस चर्चा सुरु होती. मात्र, याला पूर्णविराम मिळाल्यात जमा आहे. कारण खुद्द सल्लूने आपल्या प्रेयसीची ओळख करुन दिलेय. अर्पिताच्या लग्नाच्यावेळी या दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालविल्याचे कळते. इतकेच नाही तर सलमानने आपल्या कुटुंबियांसमोर लुलियाची ओळख त्याची प्रेयसी अशी करून दिली.

अर्पिताच्या लग्नाला उपस्थित असलेल्या एका वृत्तपत्राच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान आणि लुलिया बहुतेकवेळी एकत्र असतात. जॅकलीन आणि डेसी शाहसोबत सलमानचे प्रेमसंबंध असल्याचे बोलले जात होते. तसे गॉसीप होते. मात्र, मुळात लुलिया आणि सलमान हे एकमेकांवर प्रेम करतात. लुलिया सध्या वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत आहे. हे हॉटेल गॅलेक्सी अपार्टमेंटच्या जवळचं असून तिची सर्व बिले सल्लूच भरतो, असे पुढे आलेय.

लुलियाने अतुल अग्निहोत्रीच्या 'ओ तेरी' चित्रपटात एक आयटम साँगदेखील केले होते. पण, लुलिया ही आपल्या भावाचा बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी सल्लूचा वापर करत आहे, असा सलमानची बहिण अलविराचा समज होता. त्यामुळे तिला या दोघांचे नाते मान्य नव्हते. मात्र, आता सर्व काही ठीक असून खान कुटुंबिय अजून एका लग्नाची लवकरचं तयारी सुरु करण्याची चिन्हे आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.