यवतमाळ : अभिनेता सलमान खानविरोधात मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मोहम्मद असीम मोहम्मद आरिफ यांनी ही तक्रार नोंदवलीय. सलमानवर भारतीय दंड विधान कलम 295 अ (धार्मिक भावनांना धक्का लावणं) नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येतंय.
सलमानची एनजीओ बिइंग ह्युमनसाठी नुकताच एक फॅशन शो मुंबईत आयोजित केला होता. या शोमध्ये एका मॉडलने रॅपवर चालताना एक टी शर्ट परिधान केला होता. त्यावर, अरबी भाषेत ‘अल्लाह’ असं लिहिण्यात आलं होतं.
या कृत्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आरिफ यांनी सलमानवर केलाय. या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचं, तपास अधिकारी दिलीप चव्हाण यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.