'बाजीराव मस्तानी'तल्या रणवीरचा लूक लीक!

संजय लीला भन्साळी यांचा आगामी आणि बहुचर्चित सिनेमा 'बाजीराव मस्तानी'वर सध्या खूप मेहनत घेत आहेत. याच सिनेमात रणवीर सिंह आपल्या भूमिकेत कसा दिसतोय, ते आपण इथं पाहू शकतोय...

Updated: Oct 21, 2014, 11:14 PM IST


रणवीरचा न्यू लूक

मुंबई : संजय लीला भन्साळी यांचा आगामी आणि बहुचर्चित सिनेमा 'बाजीराव मस्तानी'वर सध्या खूप मेहनत घेत आहेत. याच सिनेमात रणवीर सिंह आपल्या भूमिकेत कसा दिसतोय, ते आपण इथं पाहू शकतोय... रणवीरचा या सिनेमातील लूक लीक झालाय...

'बाजीराव मस्तानी' या सिनेमासाठी केवळ संजयचं नाही तर यातील कलाकारही यासाठी खूप मेहनत घेताना दिसत आहेत. या सिनेमात रणवीर अगदी कमी केसांमध्ये दिसणार आहे. या फोटोत आपले केस कापताना रणवीर दिसतोय. नुकतंच, शाहीदनंही आपल्या 'हैदर' या सिनेमासाठी आपले टक्कल केलं होतं. 

शुटींगसाठी उशीर होऊ नये, यासाठी रणवीरनं फिल्म सिटीच्या जवळच गोरेगावमध्ये पाच आठवड्यांसाठी एक अपार्टमेंट भाड्यानं घेतलाय. कारण, रणवीरला मुंबईच्या ट्रॅफिकची चांगलीच ओळख आहे त्यामुळे त्याला हा वेळ वाचवायचाय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.