मुंबई: चित्रपट अभिनेत्री मराठमोळी राधिका आपटेनं एक धक्कादायक वक्तव्य केलंय. ती म्हणते चित्रपटांमध्ये सेक्स एक विक्रीचा विषय आहेय कारण समाजात हा एक वर्जित विषय आहे. राधिका लवकरच 'हंटर' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट एका लैंगिक व्यसनाधीन पुरुषाबद्दल आहे.
राधिकानं सांगितलं, 'सेक्स चालणारा विषय आहे आणि वर्जित सुद्धा, म्हणून आपल्या देशात याबद्दल एक विचित्र परिस्थिती आहे. मला वाटतं सेक्स हा विषय विकला जातो, कारण तो वर्जित आहे.'
चित्रपट 'हंटर' बद्दल बोलायला गेलं तर राधिकाचं म्हणणं आहे की, फिल्मच्या पोस्टर आणि ट्रेलर पाहून असं वाटतं की, हा एक प्रौढ विनोदी चित्रपट आहे. सोबतच आणखीही काही आहे.
राधिका सांगते, ही एक लव्हस्टोरी आणि सामान्य फिल्म आहे. फिल्मचं पोस्टर आणि ट्रेलर पाहून लोकांना वाटतंय की ही प्रौढ विनोदी फिल्म आहे. मात्र ही सामान्य फिल्म आहे. प्रत्येक जण स्वत:ला चित्रपटाशी जोडलेलं जाणवेल.
हर्षवर्धन कुलकर्णी दिग्दर्शित 'हंटर' चित्रपटात गुलशन देवैया प्रमुख भूमिकेत आहे. राधिकानं यापूर्वी 'बदलापूर' चित्रपटात काम केलं होतं आणि तिच्या कामाची चांगली स्तुतीही झाली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.