मुंबईत सिनेनिर्माता बंगल्यासमोर फायरिंग, 'सीसीटीव्ही'त कैद

सिनेनिर्माता करीम मोरानी यांच्या बंगल्याबाहेर 23 ऑगस्टला झालेल्या फायरिंगचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. करीम मोरानी यांच्या जुहू इथल्या तीन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. त्या तिघांना मुंबई क्राइम ब्रँचनं अटक केलीय. 

Updated: Sep 10, 2014, 03:30 PM IST
मुंबईत सिनेनिर्माता बंगल्यासमोर फायरिंग, 'सीसीटीव्ही'त कैद title=

मुंबई : सिनेनिर्माता करीम मोरानी यांच्या बंगल्याबाहेर 23 ऑगस्टला झालेल्या फायरिंगचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. करीम मोरानी यांच्या जुहू इथल्या तीन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. त्या तिघांना मुंबई क्राइम ब्रँचनं अटक केलीय.

या तिघांनी नुरानी यांच्या घराबाहेर कशा पद्धतीनं भ्याड हल्ला केला. त्यांचे सीसीटीव्ही फ़ुटेज झी मीडियाच्या हाती लागलंय. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बाईकवर तीन तरुण येतात. या तिघांपैकी मागे बसलेला तरुण त्यांच्या जवळील देशी कट्ट्यांतून तीन गोळ्या नुरानी यांच्या घरच्या दिशेनं झाडण्यात  आल्यात. चालत्या बाईकवरुन हा गोळीबार करण्यात आलाय.

काही सेकंदातच गोळीबार करणारे पळून जातात. या हल्ल्यानंतर नुरानी यांनी मुंबई क्राईम ब्रांचकडे तक्रार केली आणि काही दिवसातच मुंबई पोलीसांनी या तीन तरुणांच्या मुसक्या आवळल्या. मदनचंद सोनकर तथा राजू ऊर्फ फ्रान्सिस, आशुतोष वर्मा आणि रामबहादुर चौहान यांना पोलीसांनी अटक केली. 

एक धक्कादायक खुलासा म्हणजे रवी पुजारी टोळीच्या शूटरने एका इंग्रजी वृत्तपत्राच्या प्रतिनिधीलाही मारण्याचा कट रचला होता. त्या प्रतिनिधीच्या घराचा नकाशा, त्यांची जाण्या येण्याची वेळ, त्याच्या संबंधीत सर्व फोन नंबर या शूटरकडे मिळाले होते.

 इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.