न्यूयॉर्क : हॉलीवूडच्या 100 हून अधिक अभिनेत्री, गायिका आणि सेलिब्रिटीज हॅकिंगचे शिकार ठरलेत. या सर्व सेलिब्रिटीजचे न्यूड फोटो सोशल साईट ‘ट्विटर’वर पोस्ट करण्यात आलेत.
सेलिब्रिटीजशी संबंधित ही हॅकिंगची सर्वात मोठी घटना असल्याचं म्हटलं जातंय. यामध्ये जे सेलिब्रिटी निशाणा ठरलेत त्यांत ऑस्कर विजेती अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स, पॉप सिंगर रिहाना आणि टीव्ही स्टार किम कर्दाशिया यांचीही नावं आहेत.
ही घटना समोर आल्यानंतर ‘ट्विटर’नं या फोटोला तत्काळ हटवलंय. ज्या अकाऊंटवरून हे फोटो पोस्ट करण्यात आले होते ते अकाउंटही बंद करण्यात आलंय.
हिलेरी डफ, जेनी मॅककार्थी, केली कुको, केट अपटॉन, केट बोसवॉर्थ, केके पाल्मर, एवरिल लॅविग्ने, एम्बेर हेयर्ड, गॅब्रिल यूनियन, हेडन पॅनिटेयर, होप सोलो या सेलिब्रिटिंचेही न्यूड फोटो सोशल मीडियावर जाहीर करण्यात आले होते.
धक्कादायक म्हणजे, हॅकरकडे जेनिफर लॉरेन्सचे 60 हून अधिक फोटो असल्याचं उघड झालंय. लॉरन्सनं या घटनेला खाजगी जीवनाचं उल्लंघन म्हटलंय तर आरोपीविरुद्ध कारवाई करणार असल्याचे संकेतही तिनं दिलेत.
हे सगळे फोटो हॅक करण्यात आलेले फोटो खरे आहेत किंवा एडिट केलेले याबाबत मात्र अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. काही कलाकारांनी हे फोटो ‘एडिटेड’ असल्याचा दावा केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.