कंगणा आणि इमरानचा चित्रपट 'कट्टी बट्टी'चा ट्रेलर रिलीज

कंगणा राणावत आणि इमरान खानचा चित्रपट 'कट्टी बट्टी'चा ट्रेलर आज रिलीज झालाय. लॉन्च होताच अवघ्या काही तासांमध्येच ट्रेलर सोशल मीडियावर धूम करतोय.

Updated: Jun 14, 2015, 08:49 PM IST
कंगणा आणि इमरानचा चित्रपट 'कट्टी बट्टी'चा ट्रेलर रिलीज title=

मुंबई: कंगणा राणावत आणि इमरान खानचा चित्रपट 'कट्टी बट्टी'चा ट्रेलर आज रिलीज झालाय. लॉन्च होताच अवघ्या काही तासांमध्येच ट्रेलर सोशल मीडियावर धूम करतोय.

चित्रपटात कंगणाचं नाव पायल आहे आणि इमरानचं नाव मॅडीच्या भूमिकेत आहे. पायल आणि मॅडी पाच वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात आणि नंतर ब्रेक अप करतात. ट्रेलर पाहून याचा क्लायमॅक्स प्रिडिक्टेबल असल्यासारखा वाटतो. पण क्लायमॅक्स दरम्यान चित्रपटात खूप गोंधळ आणि धूम असेल ही अपेक्षा आहे.

तसं तर चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच ही वॉर्निंग दिलीय की, पायल आणि मॅडीची सिरफिरी स्टोरी लव्ह स्टोरी नाहीय. मग ही स्टोरी तरी काय? यासाठी आपल्याला फिल्म रिलीज होण्याची वाट पाहावी लागेल. १८ सप्टेंबरला 'कट्टी बट्टी' रिलीज होणार आहे. 

पाहा ट्रेलर -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.