मुंबई : काही दिवसाआधी गायक हनी सिंहने आपल्या आजारपणाबद्दल माहिती दिली होती. हनीसिंगला या आजारापणाता त्याच्या मित्राने मोठी साथ दिली होती. बायपोलर डिसऑर्डर नावाच्या आजाराचा हनी सिंहने त्याच्या मित्राच्या मदतीने सामना केला.
हा एक मेंदूचा आजार आहे, मेंटल डिसऑर्डर आहे, यात डिप्रेशन येत आणि मूड सतत बदलत असतो.
या आजारपणाचा सामना करण्यासाठी हनीसिंहला आपल्या करिअरमध्ये ब्रेक घ्यावा लागला, तेव्हा ऑस्ट्रेलियातील त्याचा उद्योजक मित्र बॉबी सुरी धावून आला, तो तब्बल १९ महिने हनीसिंहसाठी भारतात राहिला. बॉबी सुरी हा हनी सिंहचा बालपणाचा मित्र आहे.