नवी दिल्ली : फराह खान दिग्दर्शित ‘हॅपी न्यू इअर’ हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. हा सिनेमा सुरुवातीपासूनच आपल्या स्टार कास्टिंगसाठी खूप चर्चेत राहिलाय. बॉलिवूडचा किंग शाहरूख खान, दीपिका पादूकोण, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, सोनू सूद आणि विवान शाह यांसारखे कलाकार या सिनेमासाठी एकत्र आलेत. हा शाहरुखचा पहिलाच मल्टिस्टारर सिनेमा ठरलाय.
हा सिनेमा संपूर्णपणे शाहरुखमुळे चालतोय असं सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या लक्षात यायला वेळ लागत नाही. फराह नेहमी मसालेदार सिनेमा बनविण्यात हुशार आहे. या सिनेमाकबी तिचा हाच प्रयत्न आहे. शाहरुख आणि फराह यांच्या भांडणानंतर या दोघांमध्ये दुरावा आला होता. प्रेक्षकांना वाटले होते की, हे दोघे पुन्हा कधीच एकत्र येणार नाही. पण, पुन्हा मैत्रीचे संबंध जोडल्यानंतर हे दोघे पुन्हा एकत्र आल्यानं दिवाळीमध्ये हा सिनेमा शाहरुख-फराहाच्या चाहत्यांसाठी पर्वणीच ठरलाय.
सिनेमाचे कथानक
या सिनेमाची कथा आहे काही चोरांची... शाहरुख त्याच्या संपूर्ण स्टारकास्टसोबत दुबईला जातो. यात शाहरुख हा चार्लीच्या भूमिकेत आहे... अभिषेक बच्चननं नंदू भिडेची भूमिका केली असून यामध्ये तो दारुडा बनलेला दिसतोय. बोमन ईरानी पारसी व्यक्तीच्या भूमिकेत असून तो तिजोरी खोलण्यात तरबेज आहे. सोनू सूद सैन्यात काम केलं असल्यामुळे त्याला बॉम्ब बनविण्याची प्रक्रिया माहित आहे. अभिनेता नसीरूद्दीन शाहांचा मुलगा विवान कम्प्युटर हॅकिंगमध्ये माहीर दाखविला आहे.
हिरे चोरण्यासाठी हे सर्वजण दुबईला जातात. दुबईला जाण्यासाठी हे सर्वजण एका डान्सच्या स्पर्धेत सहभागी होतात. दीपिका ‘मोहिनी’ बनून एका डान्स बारमध्ये डान्स करतेय. पण, या त्यांच्या टीममध्ये दीपिकाला सोडले तर बाकी कोणालाही डान्स येत नाहीय... या सिनेमात शाहरुखने त्याच्या नेहमीच्या स्टाईलमुळे हा सिनेमा तरलाय. त्याचबरोबर बोमन ईराणी आणि अभिषेकनंही चांगला अभिनय केलाय.
अभिनय
दीपिका आपल्या भूमिकेला साजेशी दिसतेय. सोनूनेनंही प्रेक्षकांना हसविण्याचा प्रयत्न केला आहे. विवानकडे फार काही करण्यासारखे नाही. दुबईमधील सुंदर दृश्यं मोठ्या पडद्यावर चांगल्या पदधतीनं दाखविण्यात आलेत.
सिनेमाचे लेखन
या सिनेमात जुन्या सिनेमातील डायलॉग्सची नक्कल करून नवीन रुपात प्रेक्षकांसमोर सादर केलंय. हा सिनेमा गरजेपेक्षा जास्त मोठा आहे. पहिल्या भागपर्यंत हा सिनेमा ठीक आहे. परंत, दुसऱ्या भागात या सिनेमाच्या कथानकापेक्षा जास्त मोठा आहे. या सर्व गोष्टीवरून असे लक्षात येतं की, या सिनेमात फक्त मोठे स्टार आहेत. पण, जसे या सिनेमात जरी मोठे स्टार असले तरीही कथानकाला मोठे स्टार मिळणार नाहीत.
शेवटी काय तर....
शाहरुख आणि दीपिकाची केमस्ट्री खूप चांगली आहे. मसालेदार सिनेमा पाहण्याची आवड असणाऱ्यासाठी हा चांगला पर्याय आहे. पण, सिनेमाकडून फार अपेक्षा करू नका. या सिनेमाचे कथानक फारसं आकर्षक नाही आणि शाहरुख सोडून इतर स्टार्सकडे फारसं काही करून दाखवण्यासारखंही नाही... त्यामुळे तुम्ही शाहरुखचे फॅन्स असाल तर हा सिनेमा नक्कीच पाहू शकाल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.