मुंबई: भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीवर बनणाऱ्या फिल्मला ग्रीन सिग्नल मिळालाय. या चित्रपटात धोनीची भूमिका अभिनेता सुशांत राजपूत साकारणार आहे. फिल्मचा फर्स्ट लूक रिलीज झालाय.
धोनीवर तयार होणाऱ्या या सिनेमाबद्दल त्याची पत्नी साक्षीनं ट्वीटकरून शिक्कामोर्तब केलंय. साक्षीनं ट्विटरवर लिहिलं, “मागील अनेक दिवसांपासून असलेल्या अफवांना नाकारते. त्यासर्व खोट्या बातम्या होत्या... हे पाहा... बूम...”. साक्षीनं या फिल्मच्या फर्स्ट लूकचा फोटोही पोस्ट केलाय.
नीरज पांडे या फिल्मचं दिग्दर्शन करणार आहे. नीरज पांडे यांनी यापूर्वी ‘ए वेडनेस डे’ आणि स्पेशल-२६ सारखे सुपरहिट सिनेमे बनवले आहेत. फिल्म २०१५मध्ये रिलीज होणार आहे.
सुशांत सिंह राजपूरनं यापूर्वी त्याचा डेब्यू चित्रपट ‘काय पो छे’ मध्ये लहान मुलांना क्रिकेट शिकवलं होतं. सुशांत छोट्या पडद्यावरून बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे आणि प्रेक्षकांमध्ये तो खूप लोकप्रिय आहे. धोनीच्या रोलमध्ये सुशांतला प्रेक्षक पसंत करतील, अशी आशा आहे.
चित्रपटाबाबत अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. चित्रपटाच्या पैशाबद्दल हा वाद होता. धोनीनं चित्रपटासाठी ४०-४५ कोटींची मागणी केली होती. तसंच बीसीसीआयनंही फिल्मवर आक्षेप नोंदवला होता. पण, आता त्याच्या पत्नीनं ट्वीटकरून सर्व वादावर पडदा टाकलाय.
Clearing out all those rumours being carried out past few days.It was all false.. Here you go ....BOOM !!! pic.twitter.com/58vXAGe3Bc
— Sakshi Singh Dhoni (@SaakshiSRawat) September 24, 2014
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.