मुंबई : शाहरुख खान आणि काजोल ही हिट जोडी घेउन दिग्दर्शक रोहित शेट्टी बिग स्क्रिनवर घेउन आलाय दिलवाले हा सिनेमा. हा एक मल्टिस्टारर सिनेमा असून सिनेमात वरुण धवन, कृती सॅनोन, जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, वरुण शर्मा अशी कलाकारांची भली मोठी फौज पहायला मिळते. या सिनेमाची ट्रू स्टोरी ऐकण्याआधी दिलवालेवर एक नजर टाकुया..
सिनेमाची कथा
सिनेमाची सुरुवातच होते किंग खान शाहरुखच्या एंट्रीनं. शाहरुखनं या सिनेमात काली नावाच्या एका डॉनची व्यक्तिरेखा साकारली आहे, जो आधी बल्गेरियामध्ये आणि नंतर गोव्यात सेटल होतो. तो बल्गेरिया का सोडतो यावरच खरंतर सिनेमाची कहाणी बेतलेली आहे. सिनेमात शाहरुखच्या भावाची भुमिका अभिनेता वरुण धवननं साकारलीये तर काजोलच्या बहिणीची व्यक्तिरेखा कृती सॅनोननं पार पाडली आहे.
आणखी वाचा : 'दिलवाले' ट्विट समीक्षा
दिग्दर्शक रोहित शेट्टीमुळे सिनेमात भरपुर अॅक्शन आहे, रोमॅन्स आहे आणि कॉमोडीचा तडका देखील आहे.. या सिनेमातही त्यानं भरपूर गाड्या उडवल्यात.. इन फॅक्ट या वेळी जरा जास्तच महागड्या गाड्या उडवल्या आहेत.. एक टिपीकल बॉलिवूड मसाला सिनेमा पाहताना ज्या ज्या फ्लेवर्सची गरज असते त्यातले अनेक शेड्स दिलवाले पाहताना अनुभवायला मिळतात..
शाहरुख खान आणि रोहित शेट्टी हे दोघं ज्या पद्धतीचे सिनेमे करतात, त्यांच्या या दोन्ही स्टाईलच्या सिनेमांचं मिश्रण म्हणजे दिलवाले हा सिनेमा.. अनेकदा हा सिनेमा पाहुन तुम्हाला कभी खुशी कभी गमची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.
सिनेमाची हाताळणी
शाहरुख आणि काजेल ही जोडी ब-याच दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.. त्यामुळे अनेकजण केवळ याच फॅक्टरमुळे सिनेमा पहायला जातील.. सिनेमाची सुरुवात थोडीशी बोरिंग जाणवते, पण शाहरुख आणि काजोलची एंट्री होताच सिनेमा रंजक होवू लागतो.. खरंतर ही जोडीच या सिनेमाची जान आहे.. या दोघांच्या एंट्रीला, डायलॉग्सला, गाण्यांना प्रेक्षकांच्या शेट्या आणि टाळ्या मिळतील यात शंका नाही.. पण ओव्हरऑल सिनेमा पाहता, सिनेमाच्या स्र्किप्टपासूनच अनेक गोष्टी खटकतात.
सिनेमाचं संगीत छान झालंय.. संगीतकार प्रीतमनं या सिनेमाला संगीतबद्ध केलंय.. रंग दे मोहे गेरुआ असो किंवा जनम जनम असो गाणी सुंदर झालीयेत. इन शॉर्ट दिलवाले हा एक टिपीकल शाहरुख खान आणि रोहित शेट्टी यांच्या सिनेमांचं मिश्रण आहे, एक कंप्लीट टाईमपास फॅमिली एंटरटेनर..
किती स्टार्स
'दिलवाले' या सिनेमाला 3 स्टार्स..