दीपिकाने जोडले हात मात्र त्या तरुणाने त्याला हवे तेच केले

बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणचा आज वाढदिवस आहे. नुकतीच काही दिवसांपूर्वी एका स्पेशल स्क्रीनिंग कार्यक्रमासाठी गेली होती. मात्र यावेळी तिच्यासोबत जे घडले त्याची माहिती कमी लोकांना असेल.

Updated: Jan 5, 2016, 09:39 AM IST
दीपिकाने जोडले हात मात्र त्या तरुणाने त्याला हवे तेच केले title=

मुंबई : बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणचा आज वाढदिवस आहे. नुकतीच काही दिवसांपूर्वी एका स्पेशल स्क्रीनिंग कार्यक्रमासाठी गेली होती. मात्र यावेळी तिच्यासोबत जे घडले त्याची माहिती कमी लोकांना असेल.

या स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान सुरक्षा रक्षकांचे कडे तोडून एक तरुण दीपिकाजवळ आला. त्याने आपली इच्छा दीपिकाला सांगितली. यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही तो बधला नाही.

दीपिकाला त्याची इच्छा पूर्ण करण्यात अजिबात रसन नव्हता. तिने हातही जोडले मात्र अखेर त्या तरुणाने आपली इच्छा पूर्ण केलीच. खरंतर त्या तरुणाला दिपीकासोबत क्लोज सेल्फी काढायचा होता. अखेर त्याला ही संधी मिळाली.