मुंबई : झी मराठीवरील हास्याचे कारंजी फुलविणारा कार्यक्रम चला हवा येऊ द्या मध्ये सादर करण्यात आलेल्या स्किटमध्ये निलेश साबळेने केलेली प्रविण तरडेची नक्कल उपस्थितांना खळखळून हसवून गेली.
चला हवा येऊ द्या च्या या भागात थुकरटवाडीत येणार आहेत असे कलाकार जे आंतरमहाविद्यालीयन नाट्यस्पर्धेतून आज नावारुपाला आले आहेत. ज्यांच्या कारकिर्दीला आकार देण्यात विविध नाट्यस्पर्धांचा मोठा वाटा आहे.
सहभागी कलाकार संजय मोने, अमृता सुभाष, सिद्धार्थ जाधव, स्पृहा जोशी, प्रियदर्शन जाधव, प्रविण तरडे, प्रथमेश परब गायक संगीतकार अमितराज, संतोष पवार आदी कलाकार सहभागी झाले होते.
या कलाकारांनी आपल्या नाट्यस्पर्धेच्या आठवणी सांगितल्या आणि थुकरटवाडीतील मंडळींसोबत धम्मालसुद्धा केली.
येत्या सोमवारी आणि मंगळवारी रात्री ९.३० वा. झी मराठीवर हे दोन्ही भाग बघायला मिळतील.