रॅम्प हटवा, अन्यथा... महापालिकेचा शाहरुखला दणका

ख्यातनाम सिने अभिनेता शाहरूख खान याला अखेर मुंबई महापालिकेनं दणका दिलाय.

Updated: Feb 6, 2015, 11:18 AM IST
रॅम्प हटवा, अन्यथा... महापालिकेचा शाहरुखला दणका title=

मुंबई : ख्यातनाम सिने अभिनेता शाहरूख खान याला अखेर मुंबई महापालिकेनं दणका दिलाय.

शाहरूख खानच्या मन्नत बंगल्याबाहेर बांधण्यात आलेला अनधिकृत रॅम्प हटवण्याचे आदेश महापालिकेनं दिलेत. येत्या सात दिवसांत रॅम्प हटवा, नाही तर आम्हाला तो तोडण्याची कारवाई करावी लागेल, अशा आशयाची नोटीस मुंबई महापालिकेनं बजावलीय.

शाहरूखची व्हॅनिटी व्हॅन उभी करण्यासाठी मन्नतबाहेर अनधिकृत रॅम्प बांधण्यात आलाय. स्थानिक रहिवाशांना या रॅम्पचा त्रास होत होता.

रहिवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर खासदार पूनम महाजन यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र लिहून रॅम्प हटवण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालिकेनं ही कारवाई केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.