बिग बी झाले महाराष्ट्राचे 'बागवान'!

बिग बी अमिताभ बच्चन आता आपल्याला मराठी वेशात चक्क फळांचं प्रमोशन करतांना दिसणार आहेत. राज्यातील फळबागांना चालना देण्यासाठी अमिताभ बच्चनची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नेमणूक करण्यात आली.

Updated: Jul 27, 2014, 02:50 PM IST
बिग बी झाले महाराष्ट्राचे 'बागवान'! title=

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन आता आपल्याला मराठी वेशात चक्क फळांचं प्रमोशन करतांना दिसणार आहेत. राज्यातील फळबागांना चालना देण्यासाठी अमिताभ बच्चनची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नेमणूक करण्यात आली.

याबद्दलची माहिती खुद्द अमिताभ बच्चन यांनीच दिलीय. त्यांनी ट्विटरवर आपल्या मराठी लूकचे फोटोही टाकले आहेत. गुजरात पर्यटनाचं प्रमोशन करणारे अमिताभ बच्चन यांना महाराष्ट्र सरकारनं फळबागांसाठी जाहिरात करण्याचा प्रस्ताव दिला. राज्य सरकारच्या प्रस्तावाला अमिताभ बच्चननं मंजुरी दिली आहे. फलोत्पादन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वीच अमिताभची अॅम्बेसेडर म्हणून निवड केल्याची माहिती दिली होती.

आपल्या ट्विटमध्ये बिग बी म्हणाले, फळांच्या उत्पादनात राज्याचा पहिला क्रमांक लागतो हे मला माहितीच नव्हतं. त्यामुळं आता बिग बी महाराष्ट्राची ओळख असणारे हापूस आंबे, द्राक्षं, डाळिंब यासह अनेक फळांचं प्रमोशन करताना लवकरच दिसणार आहे. 

T 1158 - I never knew Maharashtra was the No 1 state in fruit production of many varieties .. happy promoting it for Horticulture Ministry !

— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 26, 2014

T 1158 - Horticulture Ministry makes me Brand Ambassador for fruit products .. Jitendra Awhad, Minister promotes ! pic.twitter.com/Ij7vfARE6n

— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 26, 2014

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.