मुंबई : अभिनेत्री विद्या बालन अभिनित 'कहाणी' या चित्रपटाचा रीमेक हॉलिवूडमध्ये पाहायला मिळणार आहे. चित्रपट 'ड्रॅगन टॅटू'चे दिग्दर्शक निल्स आर्डेन ओपलेव हे यश राज फिल्म्स सोबत आंतरराष्ट्रीय सिनेमा बनवत आहेत.
2012 मध्ये आलेल्या 'कहाणी' या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजोय घोष यांनी सांगितलं की, यश राज फिल्म्सने उचलेलं योग्य पाऊल आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य चोप्रांनी सांगितले, आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी ते 'कहाणी' हा चित्रपट बनवू इच्छिता. मला वाटले की ते गंमत करत आहेत. पण यश राज फिल्मने हा इंग्रजी चित्रपट निर्माण करण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही.
जोस रिवेरा आणि रिचर्ड रेगेंन लिखित स्क्रिप्ट पाश्चात्य प्रेक्षकांच्यादृष्टीने अनुकूल आहे. निल्स दिग्दर्शित हा चित्रपट मी प्रत्यक्षात बघणार आहे. हा चित्रपट एक अमेरिकन महिलेवर आधारित आहे. गायब पतीच्या शोधात कोलकाताला ती महिला जाते. जेवढी ती सत्याजवळ जाते तेवढी ती स्वत:ला एका षडयंत्राच्या केंद्रस्थानी पाहाते, असे या कथेचे थिम आहे.
फिल्म ‘कहाणी’ला ‘डायटी’मध्ये बदलण्यासाठी निल्स हा योग्य दिग्दर्शक आहे, असे यश राज फिल्मचे सीईओ उदय चोप्रा यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.