दोन सुपस्टारचे सिनेमे दिवाळीत होणार रिलीज

आगामी दिवाळीत चाहत्यांसाठी आमिर खान आणि रजनिकांत यांचे सिनेमा रिलीज होणार आहेत. दोन्ही अभिनेत्यांनी दिवाळी सुटी बघून आपले सिनेमे रिलीज करणार आहेत. 

Intern Intern | Updated: Apr 11, 2017, 10:49 AM IST
दोन सुपस्टारचे सिनेमे दिवाळीत होणार रिलीज title=

मुंबई : आगामी दिवाळीत चाहत्यांसाठी आमिर खान आणि रजनिकांत यांचे सिनेमा रिलीज होणार आहेत. दोन्ही अभिनेत्यांनी दिवाळी सुटी बघून आपले सिनेमे रिलीज करणार आहेत. 

आमिर खानचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ तर रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा ‘रोबोट २.०’ हे दोन सिनेमे दिवाळीत रिलीज होणार आहेत.

आमिरचा सीक्रेट  ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा चित्रपट अद्वैत चंदन यांनी दिग्दर्शित केला आहे. या आधी संजय दत्तच्या 'भूमी' चित्रपटासोबत चार ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज करण्यात येईल, असे आमिरने म्हटले होते.

परंतु हिंदी चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी केलेल्या ट्विट नुसार आमिरचा हा चित्रपट दिवाळीत रिलीज होणार आहे. त्यामुळे आमिरचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ आणि रजनीकांत व अक्षय कुमार यांचा ‘रोबोट २.०’ हे दोन्ही चित्रपट दिवाळीत रिलीज होण्याचे संकेत आहेत.  

‘सीक्रेट सुपरस्टार’मध्ये दंगल चित्रपटातील जायरा वसीम ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे.