मुंबई : केआरकेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन आपली बदनामी करण्यात येत आहे, असे सांगत अभिनेता अजय देवगण यांने करण जोहरवर सनसनाटी आरोप केला. शिवाय सिनेमाच्या निगेटीव्ह पब्लिसिटीसाठी करण जोहरची 25 लाखांची सुपारी देत असल्याचा गंभीर आरोप केला.
अजय देवगणच्या शिवाय या सिनेमाबद्दल निगेटीव्ह पब्लिसीटी करण्यासाठी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने कमाल आर खान ऊर्फ केआरकेला 25 लाख रुपये दिल्याची माहिती शिवायचा सह-निर्माता अजयचा खास मित्र कुमार मंगत याने दिली.
अजय देवगणचा शिवाय आणि करण जोहरचा ये दिल है मुश्किल या दोन सिनेमांमध्य़े बॉक्स ऑफिसवर या दिवाळीत टक्कर बघायला मिळणार आहे. शिवाय हा अजयसाठी महत्त्वाकांक्षी सिनेमा आहे. मात्र करणने केआरकेला या सिनेमाच्या निगेटिव्ह पब्लिसीसाठी 25 लाख रुपये दिले आहेत.
आता तर शाहरुख खानने करण जोहरच्या माध्यमातून कमाल आर खानच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुन्हा एकदा अजय देवगणवर निशाणा साधला असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगतेय. किंग खानच्या जब तक है जान आणि अजय देवगणच्या सन ऑफ सरदारच्यावेळेस पण असाच वाद उदभवला होता.