www.24taas.com, वृत्तसंस्था, शांघाय
मोबाईलचे वेड युवा पिढीला आहे. त्यामुळे कॉलेज युवकांच्या हाती मोबाईल हमखास दिसतो. तर मुलींमध्येही मोबाईलची क्रेझ आहे. मात्र, इथे हौर आहे ती एका पित्याला. त्याची ही हौस मुलीवरच बेतली. चक्क मोबाईल घेण्यासाठी त्याने स्वत:च्या मुलीलाच विकले आणि फोन घेतला.
‘आयफोन` खरेदी करण्यासाठी चक्क आपल्या पोटच्या मुलीला विकल्याची धक्कादायक प्रकार शांघाय येथील एका युवा दांपत्याने केला आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, शांघाय येथील या दांपत्याला ‘आयफोन` खरेदी करायचा होता. मात्र, तेवढे पैसे त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे आयफोनची खरेदी अशक्य होती. ‘आयफोन` खरेदी करण्यासाठी त्यांनी आपल्या तिसऱ्या अपत्यालाच विकून ‘आयफोन` खरेदी करण्याचे ठरविले. आणि त्यानुसार इंटरनेटद्वारे त्यांनी मुलीला विकलेही.
छोट्या मुलीला विकून आलेल्या पैशांनी त्यांनी चैन केल्याचे उघड झाले आहे. चिमुकलीला विकून आलेल्या पैशांमधून या दांपत्याने ‘आयफोन`, महागडे स्पोर्टस शूज आणि इतर साहित्य खरेदी केल्याची कबुली दिली आहे. या दांपत्याने पोलिसांना सांगितले, आपल्याला तिसरे अपत्य झाल्यानंतर त्याचे चांगले संगोपन करणे अशक्य झाले होते. तिसऱ्या अपत्याचे चांगले संगोपन व्हावे, या उद्देशानेच त्याला चांगल्या घरात दिले होते. त्याला विकण्याचा आमचा मुळीच उद्देश नव्हता’. दरम्यान, जन्मदात्यांनीच मुलीला विकण्याच्या या अमानवी कृत्याचा सर्वत्र निषेध होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.