www.24taas.com, वृत्तसंस्था, बीजिंग
बाल हट्ट आणि स्त्री हट्ट यांच्यापुढे किती कर्ता पुरुष असला तरी त्याचे काहीही चालत नाही. जेव्हा रायगडाला जाग येते तेव्हा या नाटकात हा संवाद आहे. त्याचाच प्रत्यय प्रत्यक्षात आलाय. हा प्रत्यय वडिलांना नाही तर आईला आलाय. आपल्या लाडक्या मुलीची हौस पुरविण्यासाठी आईने चक्क अख्खा डोंगरच भाडयाने घेतला.
आपल्या लाडक्या बाळाचे हवे ते हट्ट पुरवण्याइतकी श्रीमंती असेल तर ती हौस पुरवली जाते. तिथे पैशाला मोल नसते. चीनमधील उदयोगपतीच्या पत्नीने आपल्या मुलीसाठी डोंगर भाड्याने घेतलाय. ही महिला दर महिन्याला त्याचे तीन लाख रुपये भाडे देणार आहे.
गेन लिन (33) ही चिनी उद्योजकाची पत्नी आहे. चोंगकिंगमध्ये राहणाऱ्या गेनची कन्या जिन गान सध्या चौथीत शिकते. नऊ वर्षांच्या या मुलीला निसर्गाबाबत कुतूहल आहे. निसर्गाच्या गोडीमुळे तिने हट्ट केला. निसर्ग जाणून घेण्यासाठी ती सातत्याने प्रयत्न करीत असते. आपली मुलगी निसर्गाबाबात इतकी उत्सुक आहे असे समजताच तिच्या आईने स्थानिक प्रशासनाशी बोलून अख्खा डोंगरच भाड्याने घेतलाय.
हा डोंगर जवळपास १.३ हेक्टर जागेत विस्तारलेला आहे. हा डोंगर हिरवाईने नटलेला आहे. आपल्या मुलीची आवड लक्षात घेऊन आईने डोंगरच घेतला. आता मुलीसह तिच्या मैत्रिणी या डोंगरावरील वनराईत निसर्गाला समजून घेऊ शकतील, असे तिला वाटत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.