www.24taas.com, वृत्तसंस्था, क्वालालंपूर
मलेशिया एअरलाइन्सचं विमान अचानक बेपत्ता झाले आहे. या विमानाची माहिती रडारावरून मिळत नसल्याने अपघाताची भिती व्यक्त होत आहे. या विमानात २३९ प्रवासी आणि १२ कर्मचारी आहेत. या विमानाच शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. २०० कर्मचारी मदतकार्य करीत आहेत.
मलेशिया एअरलाईन्सचे क्वालांलपूर येथून बिजींगकडे जात असलेले एमएच-३७० हे प्रवासी विमान उड्डाण घेऊन काही अंतरावर जाताच रडावरून गायब झाले. आज पहाटे पावणे तीनच्या सुमारास विमानाचा संपर्क तुटला. या विमानात भारतीय प्रवासी नसल्याचे समजते. मात्र १४ देशांचे प्रवासी होते. विमानात चीनचे सर्वाधिक प्रवासी आहेत.
विमान रात्री १२ वाजून २१ मिनिटांनी क्वालालंपूरमधून बिजींगसाठी रवाना झाले होते आणि शनिवारी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी चीनमध्ये पोहचणार होते. मात्र मलेशिया एअर ट्रॅफिक बरोबर विमानाचा संपर्क २ वाजून ४१ मिनिटांनी तुटला आणि विमानाशी कोणताही संपर्क झाला नाही.
विमानात केवळ ७ तास वापरता येणारे इंधन आहे, असे मलेशिया एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. +६०३ ७८८४ १२३४ हा मलेशिया एयरलाइन्सने हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. चीन - १५२, एक बालक, मलेशिया - ३८, इंडोनेशिया - १२, ऑस्ट्रेलिया ७, फ्रान्स ३, अमेरिका युनायटेड स्टेट्स - ३ आणि एक लहान मूल, न्यूझीलंड - २, युक्रेन - २, कॅनडा - २, रशिया - २ , इटली - २, तैवान - १, नेदरलँड्स - १, ऑस्ट्रिया - १ आदी देशांचे प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, भारतीय प्रवासी नसल्याचे सांगितले जात आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.