नवी दिल्ली : याला जगातील आठवं आश्चर्य म्हणायला कुणाची हरकत नसावी... कारण, आत्तापर्यंत तुम्ही ऑफिसमध्ये सुट्ट्या मारल्या तर तुमचा पगार कापस्याचं एव्हाना बऱ्याचदा तुम्ही ऐकलं किंवा अनुभवलं असेल... पण, एक कंपनी अशीही आहे जिथं कर्मचाऱ्यांना सुट्ट्या घेण्यासाठी पैसे मिळतात.
युनायटेड स्टेटच्या डेन्वर शहरात स्थित असलेल्या 'फुलकॉन्टॅक्टस' या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये हे आठवं आश्चर्य प्रत्यक्षात येतंय.
खरं म्हणजे, यूएस बेस एका सॉफ्टवेअर कंपनीत सुट्टी घेणं, हे खूप गंभीर काम मानलं जातं. इथं काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचारी - अधिकाऱ्याला ७,५०० डॉलर्स अर्थात जवळपास पाच लाख रुपये सुट्ट्या घेण्यासाठी बोनस दिला जातो.
यासाठी, एकच अट आहे ती म्हणजे... सुट्टीच्या काळात तुम्ही कंपनीच्या कामकाजापासून पूर्णपणे दूर राहायला हवं. जर तुम्ही हा नियम मोडला तर तुमच्या पगारातून पैसे कापले जातात.
कंपनीचे फायनान्स आणि ऑपरेशन डायरेक्टर जेनेट रसल यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्या सुट्टीवर असतात तेव्हा मोबाईल, ईमेल अॅप्लिकेशन इ. डिलीट करून टाकतात आणि आपला लॅपटॉपही एका कोपऱ्यात ठेऊन देतात. ही त्यांच्या कंपनीची एक पॉलिसी आहे.
आपण जेव्हा वर्क लाईफ बॅलन्सबद्दल बोलतो तेव्हा आम्ही त्याला पूर्ण करूनही दाखवतो, असंही रसल म्हणतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.