भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी पाकिस्तानबद्दलचा विश्वास वाढत असल्याचे वक्तव्य केलंय. कृष्णा यांच्या वक्तव्यामुळे भारत-पाक संबंधांमध्ये सुधारणा होत संकेत यामुळे मिळाले आहेत.
मालदिव येथे भारत आणि पाकिस्तान पंतप्रधानांमध्ये होणाऱ्या 'सार्क' परिषदेतील चर्चेपूर्वी एस एम कृष्णा बोलत होते. भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये सुधारणा होत असून, पाकबद्दलचा विश्वासही वाढत आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.
पाकिस्तानने दहशतावादाविरुद्ध लढा देण्यासाठी भारताला मदत करणे आवश्यक आहे. पाकिस्तानने त्यांच्या देशात असलेल्या दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर कारवाई करणे आवश्यक आहे, असे एस एम कृष्णा म्हणाले.
तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत आफगणिस्तान, बांगलादेश, भुतान, भारत, मालदिव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांच्यात चर्चा होणार आहे.