गोव्यात शिवसेना मजबूत करणार, उद्धव यांचा निर्धार

गोव्यात शिवसेना मजबूत करण्याचा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केलाय. 

Updated: Oct 23, 2016, 12:45 PM IST
गोव्यात शिवसेना मजबूत करणार, उद्धव यांचा निर्धार title=

पणजी : गोव्यात शिवसेना मजबूत करण्याचा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केलाय. 

दिवाळीनंतर गोवा विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपाची आणि वेलिंगकरांचा पक्ष भाषा सुरक्षा मंचशी युतीची घोषणा करण्यात येणार आहे. 

गोव्यात निवडणुकीपुरती शिवसेना येणार नाही तर मुंबईत आणि महाराष्ट्रात जशी शिवसेना काम करतेय तसच गोव्यातही करणार. आम्ही हिदुत्ववादी आहोतच पण आम्ही इतर कोणाच्या विरोधात नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. पांबोळी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

भुमिपुत्रांची काळजी घेणे हे ज्या त्या सरकारची जबाबदारी, गोव्यातला एकही माणूस रोजगारासाठी बाहेर जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. 

तसेच गोव्यातल्या जनतेला बदल हवा आहे, गोव्यातल्या जनतेनं विश्वासानं पर्रीकरांच्या हाती सत्ता दिली. पण परिस्थिती बदलली नाही, असं म्हणत उद्धव यांनी पर्रीकरांवरही निशाणा साधला.