स्मृति इराणींच्या सरकारी लेटरहेड अशुद्ध, सोशल मीडियात उडवली खिल्ली

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृति इराणी यांच्यातर्फे पाठविण्यात आलेल्या पत्रात शुद्धलेखनाच्या अनेक चुका आढळल्या आहेत. या प्रकरणी स्मृति इराणी यांनी आपल्या मंत्रालयातकडे स्पष्टिकरण मागितले आहे. 

Updated: Aug 21, 2015, 03:25 PM IST
स्मृति इराणींच्या सरकारी लेटरहेड अशुद्ध, सोशल मीडियात उडवली खिल्ली title=

नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृति इराणी यांच्यातर्फे पाठविण्यात आलेल्या पत्रात शुद्धलेखनाच्या अनेक चुका आढळल्या आहेत. या प्रकरणी स्मृति इराणी यांनी आपल्या मंत्रालयातकडे स्पष्टिकरण मागितले आहे. 

स्मृति इराणी यांनी देशभरातील शिक्षकांना पाठविण्यात आलेल्या एका सरकारी पत्रात त्यांच्या लेटर हेडमध्ये शुद्धलेखनाच्या चुका आहेत. या चुकांमुळे सोशल मीडियावर एका ग्रुपकडून खिल्ली उडवली जात आहे. 

इराणी यांच्या लेटर हेडवरील मिनिस्टरचे स्पेलिंग चुकीचे आहे. तर हिंदीतील संसाधन शब्द 'संसाधान' असे लिहिले आहे. स्मृति इराणी यांनी लेटर हेड देशभरातली शाळांमधील प्राध्यापकांना विद्यार्थ्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी पाठविले होते. 

या संदर्भात स्मृति इराणी यांनी याचे उत्तर ट्विटरवर दिले असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.