बिहारमध्ये दारूबंदी असताना जप्त दारुवर पोलिसांचा डल्ला, दोघांना अटक

बिहारमध्ये दारूबंदी असताना जप्त केलेल्या दारूवर पोलीसच डल्ला मारत असल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणी पोलीस संघटनेचे अध्यक्ष निर्मल सिंग आणि एक सदस्य शमशेर सिंग यांना अटक करण्यात आली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 4, 2017, 11:16 PM IST
बिहारमध्ये दारूबंदी असताना जप्त दारुवर पोलिसांचा डल्ला, दोघांना अटक title=
सौजन्य : डिएनए

पाटणा : बिहारमध्ये दारूबंदी असताना जप्त केलेल्या दारूवर पोलीसच डल्ला मारत असल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणी पोलीस संघटनेचे अध्यक्ष निर्मल सिंग आणि एक सदस्य शमशेर सिंग यांना अटक करण्यात आली आहे.

या दोघांनाही 18 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आलीये. राज्यात पोलिसांनी जप्त केलेलं 9 पूर्ण 15 लाख लिटर मद्य पोलीसांच्या 'मालखान्या'त असलेल्या उंदरांनी फस्त केल्याची आकडेवारी स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली.

त्यानंतर पोलीस सावध झाले असून पोलिसच या मद्याचा दुरुपयोग करत असल्याचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला. पाटण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनू महाजन यांनी मालखान्यांचं नियमित ऑ़डिट करण्याची गरज असल्याचं म्हटले आहे.