पुष्कर : राजस्थानच्या पुष्करमध्ये एका हॉटेलमध्ये एैश करणे काही तरूणांना खूपच महागात पडले आहे. पोलिसांननी हॉटेलमध्ये छापा मारून तरूण आणि सेक्स रॅकेट चालविणाऱ्यांना अटक केली आहे. कारवाई झाली त्यावेळी संपूर्ण हॉटेलमध्ये पळापळ झाली.
अधिक वाचा : युवतीवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओ व्हायरल
पुष्कर येथील महाराजा गेस्ट हाऊसमध्ये देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी एक प्लान बनवला. त्यानंतर शुक्रवारी हॉटेलवर छापा टाकला तर त्यात दोन खोल्यांमध्ये कॉलगर्ल्ससोबत ग्राहक विचित्र अवस्थेत सापडले. पोलिसांनी दोन्ही मुलींसोबत ग्राहकांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी हे प्रकरण मीडियापासून लपविण्याचा प्रयत्न केला. पण सहआरोपींना कोर्टात नेताना सर्व प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी किशनगढची इंद्रा, पश्चिम बंगालची शिल्पा, गोपाल सिंह आणि हॉटेल मॅनेजर सत्यनारायणला अटक करण्यात आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.