नवी दिल्ली : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत.
पेट्रोल 58 पैशांनी तर डिझेल 25 पैशांनी स्वस्त झालंय. आज मध्यरात्रीपासून हे दर लागू होणार आहेत.
पेट्रोल आणि डिझेलचे दर घटल्यानंतर दिल्लीत पेट्रोल 45.55 रुपये लीटर तर डिझेल 59.48 रुपये लीटर मिळणार आहे. कोलकत्यामध्ये पेट्रोल 65.71 रुपये लीटर आणि डिझेल 50.04 रुपये लीटर मिळेल. चेन्नईमध्ये पेट्रोल 60.80 रुपये लीटर तर डिझेल 47.75 रुपये प्रति लीटर मिळणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.