'सामना' अग्रलेखांबाबत उद्धव ठाकरेंनीच निर्णय घ्यावा - गडकरी

केंद्रातील मोदी सरकारवर वारंवार टीका करणाऱ्या शिवसेनेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सबुरीचा सल्ला दिलाय. सत्तेमध्ये राहून सरकारवर टीका करणं टाळावं, असं सुनावतानाच, सामनाच्या अग्रलेखाबाबत उद्धव ठाकरेंनीच निर्णय घ्यावा, असं मत गडकरींनी व्यक्त केलंय. 

Updated: May 27, 2015, 03:09 PM IST
'सामना' अग्रलेखांबाबत उद्धव ठाकरेंनीच निर्णय घ्यावा - गडकरी title=

नागपूर: केंद्रातील मोदी सरकारवर वारंवार टीका करणाऱ्या शिवसेनेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सबुरीचा सल्ला दिलाय. सत्तेमध्ये राहून सरकारवर टीका करणं टाळावं, असं सुनावतानाच, सामनाच्या अग्रलेखाबाबत उद्धव ठाकरेंनीच निर्णय घ्यावा, असं मत गडकरींनी व्यक्त केलंय. 

पंतप्रधान मोदी आणि माझे फार चांगले संबंध आहेत. मोठे निर्णय घेताना मोदी विश्वासात घेतात, असंही त्यांनी सांगितलं. 

मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त 'झी 24 तास'ला दिलेल्या रोखठोक मुलाखतीत गडकरी बोलत होते. 'झी 24 तास'चे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी घेतलेली ही मुलाखत आज रात्री 9 वाजता पाहता येणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.