नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची आर्थिक धोरणे दिशाहीन असल्याची टीका, अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये केंद्रिय मंत्रीपद भुषविणा-या अरूण शौरी यांनी केली आहे. एका मुलाखतीदरम्यान अरूण शौरी यांनी थेट मत मांडली.
सरकार धोरणं प्रत्यक्षात उतरवण्यापेक्षा, स्वत:चं मार्केटिंग करण्यात अधिक व्यस्त असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. तसंच गुंतवणुकीच्या सुरक्षिततेची आणि लाभाची हमी नसेल तर गुंतवणूक कशी वाढणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. इतर शेजारी राष्ट्रांशी संबंध सुधारले असले तरी भारत-पाकिस्तान प्रश्न आपण सोडवू शकतो या अति आत्मविश्वासाने मोदी सरकारची फसगत झाल्याचंही शौरी म्हणाले.
मोदी सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेताना ते म्हणाले, सरकारचा कारभार काही बाबतीत चांगला असला तरी आर्थिक चित्र पालटण्याचे आश्वासन मात्र पाळले गेलेले नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.