श्रीनगर : अखनूर युनीटमधील लेफ्टनंट डॉ. उमर फयाज हे आपल्या नातेवाईकांच्या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. यावेळी लग्नमंडपातून त्याचे दहशतवाद्यांनी अपहण केले. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती पुढे आलेय.
शोपियान भागात लेफ्टनंट डॉ. उमर फयाज यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. दक्षिण काश्मीरच्या हरमन भागात त्यांचा मृतदेह आढळला. कुलगाममध्ये राहणाऱ्या फयाज यांचे काल दहशतवाद्यांनी अपहरण केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली होती.
फयाज हे नुकतेच सैन्यात दाखल झाले होते. त्यांचे पोस्टिंग अखनूर युनिट येथे झाले होते. काल ते कौटुंबिक लग्न सोहळा कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गेले होते. त्यांचे लग्नमंडपातून बंदुकीचा धाक दाखवून दहशतवाद्यांनी अपहरण केले. त्यानंतर त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. त्यांच्या शरीराची अक्षरश: चाळण करण्यात आली.