नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी साऊथ ब्लॉकच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना या महिलेनं पंतप्रधानांच्या ताफ्यावर हल्ला केला. महिलेने कुंडी मोदींच्या कारवर भिरकावली.
पंतप्रधान मोदींच्या सुरक्षारक्षकांनी यानंतर त्या महिलेला ताब्यात घेतलं. या महिलेनं हल्ला का केला हे अद्याप कळू शकलेलं नाही. संसदमार्ग पोलीस ठाण्यात या महिलेची चौकशी सुरू आहे.