चंदीगड: पंजाबमध्ये ड्रग्स विक्री आणि सेवनाचे प्रकार दररोज समोर येत आहेत. ड्रग्जचा धंदा करण्यासाठी वेगवेगळे फंडे पंजाबमध्ये वापरले जात आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार पंजाबमध्ये समोर आला आहे. पराठ्यांमध्ये भरून ड्रग्ज विक्री होत असल्याचं समोर आलं आहे.
पराठा बनवण्यासाठीच पीठ मळतानाच हे ड्रग्ज त्यात मिसळले जातात, ज्यात अफू, गांजाच्या गोळ्यांचा वापर केला जातो. काहीच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या 'मन की बात' मधून पंजाबमधल्या ड्रग्जच्या प्रश्नामुळे होणाऱ्या नुकसानावर भाष्य केलं होतं. पण पंजाबमधली ही समस्या काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.