नवी दिल्ली: दिल्ली पोलीस आणि आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत
दक्षिण दिल्ली परिसरातील वकिलाच्या एका ऑफिसचमधून तब्बल 13 कोटी 65 लाख रूपये जप्त करण्यात आले आहेत.
ग्रेटर कैलाश परिसरात टी अॅन्ड टी नावाच्या लॉ फर्मच्या ऑफिसमध्ये हा छापा टाकण्यात आला. यामध्ये 2.50 कोटीच्या नव्या नोटांचा समावेश आहे. ऑफिसमधून पैसे मोजण्याच्या दोन मशीनही जप्त करण्यात आल्या आहे.
सुत्रांच्या माहितीनूसार छापेमारीच्यावेळी ऑफिसच्या दरवाजांना लॉक होते आणि दरवाजांवर केअर टेकर उपस्थित होते. या प्रकरणी लवकरच मोठी अटक होण्याची शक्यता आहे. टी अॅन्ड टी लॉ फर्म मालकाचे नाव रोहित टंडन असून वकीलीचा व्यवसाय करणारा आरोपी रोहित लॉबिंगही करतो.
यावर्षी ऑक्टोबर महिन्यात आयकर विभागाने रोहितच्या नावावरील अनेक ठिकाणी छापेमारी केली असता कोटींच्या घरातील काळापैसा आयकर विभागाच्या हाती लागला होता.
वकीलाकडे एवढ्या मोठ्याप्रमाणावर रोकड कुठून आली आणि ही रोकड नक्की आहे कोणाची याबद्दल चौकशी सुरू असल्याची प्रतिक्रिया तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.