नवी दिल्ली : वेश्यावृत्ती बाबत समाजाचा जो दृष्टीकोण आहे तो निंदाजणक आहे. वेश्याव्यवसाय ही समाजाची वृत्ती चुकीची आहे. जे लैंगिकशोषण करतात तेच बलात्काराचे समर्थन करीत आहेत, असे प्रतिपादन दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी केलेय.
वेश्यावृत्ती ही बलात्कारासमान आहे. हा समाजाला लागलेला डाग आहे. शासनाने वेश्याव्यवसायाचे निर्मूलन करण्याची गरज आहे. दर महिन्याला दिल्लीतील जी.बी.रोडमधील रेडलाईट परिसरात कंडोम कथित स्वरुपात वाटण्यात येत आहे. याचा उल्लेख करुन मालीवाल म्हणाल्यात, ६ लाख कंडोम वाटप म्हणजे ६ लाख बलात्कार होय. याला दिल्ली एक प्रकारे मंजुरी देत आहे.
मालीवाल यांनी दिल्लीतील रेडलाईट परिसराची पाहाणी केली. त्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यावेळी तुम्ही जर हा रेडलाईट परिसर बंद केला तर बलात्कार वाढ होईल, असे लोकांनी सांगितल्यावर त्यांनी चीड व्यक्त केली. अशी ज्यांची मानसिकता आहे ती चुकीची आहे. ज्याकाही समस्या आहेत त्या आम्ही राज्य सरकार आणि सामाजिक संस्था तसेच केंद्राच्या सहकार्यातून सोडवू, असे त्या म्हणाल्यात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.