नवी दिल्ली : समाजातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात आवाज उठवला जात आहे. अनेक साहित्यिकांनी पुरस्कार परत करण्याचा धडाकाच लावलाय. पंजाबी लेखिका पद्मभूषण दलिप कौर तिवानांनी पुरस्कार परत केलाय.
बंड पुकारणा-या साहित्यिकांच्या प्रामाणिकतेवर संघाने तीव्र नाराजी व्यक्त केलेय. आजच काही घटना घडलेल्या नाहीत. याआधीही अशाच घटना घडल्यात त्यावेळी साहित्यिक का गप्प होते. तेव्हा कुठे गेली यांची सहिष्णुता, असा खोचक सवाल संघाने उपस्थित केलाय.
दरम्यान, मराठी साहित्यिकांचाही आपला एल्गार सुरुच ठेवला प्रज्ञा दया पवार आणि हरिश्चंद्र थोरातांसह चार साहित्यिकांकडून सर्व सरकारी पुरस्कार परत केलेत.
उत्तर प्रदेशातील दादरी येथील हत्याकांडाची घटना, मुंबईतील पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द होणे यासारख्या घटनांवर आपले मौन सोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटना दुःखद असल्याचे म्हटले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.