प्रेतांचे अवयव कापून दागिने केले लंपास!

साधूंच्या रूपातील काही बदमाषांनी पाण्यात तरंगणाऱ्या नोटांवर डल्ला मारला होता. तर काही लुटारूंनी दागिने लुटण्यासाठी क्रुरपणे भाविकांच्या प्रेतांचे अवयवही कापले.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 25, 2013, 04:59 PM IST

www.24taas.com, उत्तरकाशी
चार धाम यात्रेत पुराच्या संकटांसोबत लुटारूंच्या संकटालाही भाविकांना सामोरं जावं लागत आहे. साधूंच्या रूपातील काही बदमाषांनी पाण्यात तरंगणाऱ्या नोटांवर डल्ला मारला होता. तर काही लुटारूंनी दागिने लुटण्यासाठी क्रुरपणे भाविकांच्या प्रेतांचे अवयवही कापले.
पूराच्या तडाख्यात ज्या भाविकांना प्राण गमवावा लागला, त्या भाविकांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन,बांगड्या, कानातील डुलं चोरण्यासाठी शरीराची अंगंच लुटारूंनी कापली. अनेक प्रेतांच्या बोटांमधील अंगठ्या काढता येत नव्हत्या, तेव्हा या प्रेतांची बोटंचा लुटारूंनी कापून काढली. नाकातील नथ मिळवण्यासाठी नाकच कापून नेलं. तसंच प्रेतांच्या खिशांतील पैसे लंपास केले जात आहेत. बचावकार्य करणाऱ्या पथकाला या संकटांपासूनही भाविकांचं संरक्षण करावं लागत आहे.

अशा विद्रुप प्रेतांमुळे उत्तराखंडातील वातावरण अधिक भयाण बनत आहे. पुराच्या संकटांशी सामना करणाऱ्या भाविकांना आपल्याकडील संपत्ती जपण्याचे कष्टही घ्यावे लागत आहेत. अनेक नेपाळी टोळ्यांनी भाविकांना लुटलं आहे. त्यामुळे या संकटांमधून बाहेर पडण्यासाठी भाविकांचा आक्रोश सुरू आहे..

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.