नवी दिल्ली : उत्तर भारतात गारठा वाढू लागलाय. शिमला आणि मनालीमध्ये शनिवारपासून जोरदार हिमवृष्टी सुरु आहे.
सतत होणारी बर्फवृष्टी आणि कोसळणारे हिमकडे यामुळे जवळपास दोन हजार पर्यटक अडकलेत. त्यापैकी ५० पर्यटकांनी रोहतांगच्या जवळ मंढी इथं आसरा घेतलाय. गेल्या ८० तासाहून अधिक काळ लोटला तरी मनाली इथं ते पोहचू शकलेले नाहीत.
मनाली रोहतांग हा मार्गही बंद झालाय. शनिवारपासून हा मार्ग बंद आहे. लष्करानं आता तिन्ही बाजूनी मार्ग मोकळा करण्याचं काम हाती घेतलंय.
दरम्यान, जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात लेहमध्ये सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाळी राजधानी असलेल्या श्रीनगरचे तापमानही सुमारे चार अंश सेल्सिअसने उतरले आहे.
लेहमध्ये काल रात्री उणे 9.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर कारगिलचे तापमान उणे 6.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.