www.24taas.com, चेन्नई
जग सध्या वादळांच्या दहशतीच्या छायेत आहे. अमेरिकेत `सँडी` वादळानं थैमान घातलय. तर भारतातली आंध्र आणि तामिळनाडू ही राज्य नीलम या चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडण्याची चिन्ह आहेत.
आंध्र प्रदेश तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात नीलम चक्रीवादळ येणार आहे. त्यामुळं किनारपट्टीला लगतच्या जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट घोषीत करण्यात आलाय. बुधवारपर्यंत वादळ किनारपट्टी भागात धडकण्याची शक्यता आहे.
वादळाच्या पार्श्वभूमीवर चैन्नईतल्या शाळा कॉलेजसना सुट्टी देण्यात आलीये. तर आंध्र आणि तामिळनाडू शहरांमध्ये आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलीये. सध्या आंध्र आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात पाऊस सुरु झालाय.
दरम्यान, महासत्ता म्हणून ओळखली जाणारी अमेरिका सध्य़ा दहशतवादी हल्ल्यासारख्याच भीषण अवस्थेला पोहोचलीय. अमेरिकेच्या पूर्वकिनारपट्टीवर `सँडी`वादळानं थैनान घातलं असून मोठ्या प्रमाणात देशातलं जनजीवन विस्कळीत झालंय. `सँडी`नं आतापर्यंत १५ जणांचा बळी घेतला असून मृतांचा आकडा वाढण्याची चिन्ह आहेत.